सानिया मिर्झाला 'खेलरत्न' पुरस्कार प्रदान

सानिया मिर्झाला 'खेलरत्न' पुरस्कार प्रदान

  • Share this:

saniya khelratna29 ऑगस्ट : भारताची टेनिस स्टारपटू सानिया मिर्झाला देशाचा सर्वोच्च 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतल्या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार तिला देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारायला सानिया खास अमेरिकेहून भारतात आली होती. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 24 खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

सानियाने मिर्झाने क्रीडा मंत्रालयाने आपल्या नावाची शिफारस केली म्हणून आभार मानले. देशाचा सर्वोच्च पुरस्कार आपल्याला देण्यात आला ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे अशी भावना सानियाने व्यक्त केली. विशेष म्हणजे, सानिया मिर्झाला पुरस्कार देण्यावरून वाद निर्माण झाला होता. कर्नाटक हायकोर्टाने सानिया देण्यात येणार्‍या पुरस्कारबद्दल विचारणा केली होती. अखेर या वादावर पडदा पडला असून सानियाला सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

अर्जुन पुरस्कार

रोहित शर्मा- क्रिकेट

बजरंग कुमार- कुस्ती

बबीता कुमारी- कुस्ती

मंदीप जांगडा - बॉक्सिंग

आर. श्रीजेश- हॉकी

एम.आर पूवम्मा- ऍथलेटिक्स

सतीश शिवालिंगम- वेटलिफ़्टिंग

जीतू राय- शूटिंग

मंजीत छिल्लर- कबड्डी

अभिलाषा एस म्हात्रे- कबड्डी

श्रीकांत किदाम्बी- बॅडमिंटन

युमनाम सनाथाई देवी- वुशु

स्वर्ण सिंह- रोइग

दीपा कर्माकर- जिमनॅस्टिक्स

संदीप कुमार- तिरंदाजी

अनूप कुमार यामा- रोलर स्केटिंग

द्रोणाचार्य पुरस्कार

नवल सिंह- ऍथलेटिक्स- पैरा स्पोर्ट्स

अनूप सिंह- कुस्ती

हरबंस सिंह- ऍथलेटिक्स

स्वतंत्र सिंह- बॉक्सिंग

निहार अमीन- जलतरण

ध्यानचंद पुरस्कार

रोमियो जेम्स- हॉकी

 शिव प्रकाश मिश्रा- टेनिस

टीपीपी नायर- व्हॉलीबॉल

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 29, 2015, 10:01 PM IST

ताज्या बातम्या