औरंगाबादमध्ये मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

  • Share this:

rape dsngfsdg

29 ऑगस्ट : मित्रासोबत फिरायला गेलेल्या 22 वषच्य तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. सुंदरवाडी शिवारात गुरुवारी रात्री 8.30वाजता ही घटना घडली. या नराधमांनी चाकूचा धाक दाखवत तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार केला.

22 वषच्य तरुणी कामानिमित्त औरंगाबादमध्ये राहत होती. गुरुवारी रात्री ती तिच्या मित्रासोबत केंब्रीज स्कूल परिसरातून बाईकवरुन जात होती. पण या शाळेपासून बायपास जळगाव रोडवरील शिवनेरी हॉटेलजवळ बाईक थांबवून ते बोलत होते. मात्र तिथे आलेले चार टवाळखोर त्यांच्याजवळ थांबले. तिथे फारशी वर्दळ नसल्याचं पाहून त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या मैत्रिणीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

दरम्यान, बलात्कारानंतर तरुणीने चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंदवलेला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Aug 29, 2015 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading