सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही स्नानासाठी नाशिक सज्ज

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही स्नानासाठी नाशिक सज्ज

  • Share this:

slide3_2525983g

28 ऑगस्ट : 12 वर्षांनी येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली शाही पर्वणी उद्याच्या श्रावण शुध्द पौर्णिमेला होणार आहे. यासाठी लाखो भाविक नाशिक शहरात दाखल झाले आहेत. या पहिल्या शाही स्नानाच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

पहिल्या शाही स्नानासाठी होणारी गर्दी बघता उद्या शाही स्नानात सहभागी होता येईल की नाही, अशी शंका असल्याने भाविक गेल्या दोन दिवसांपासून रामकुंड आणि कुशावर्तात येऊन स्नान करून जाताहेत. हा कुंभ म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणता येईल कारण श्रावण मासात येणारा हा सिंहस्थ कुंभमेळा आपल्याला एक तपाचं पुण्य देऊन जातो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नाशिक रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधलं कुशावर्त तिर्थ भाविकांनी सजलं आहे.

शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण आराखडा शहर पोलिसांनी जाहीर केला आहे. शाही स्नानाच्या दिवशी रामकुंडापर्यंतच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

श्रावण वद्य अमावास्येला म्हणजे 13 सप्टेंबरला दुसरं शाही स्नान आणि ऋषिपंचमीला 18 सप्टेंबरला तिसरं शाही स्नान होणार आहे. त्यामुळे एकूणच सध्या त्रंबक आणि नाशिकमध्ये भक्तीमय वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 28, 2015, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading