नाशिकला जाताय ?, मग या मार्गाने करा प्रवास !

नाशिकला जाताय ?, मग या मार्गाने करा प्रवास !

  • Share this:

nashik_Way28 ऑगस्ट : नाशिकमध्ये भरलेल्या कुंभमेळ्याला उद्या म्हणजे 29 ऑगस्टपासून खरी सुरुवात होणार आहे. 29 ऑगस्टला शाहीस्नान होणार आहे. त्यामुळे या शाहीस्नानासाठी आजपासूनच नाशिकची वाहतूक वळवण्यात आलीये. 28 ऑगस्टला संध्याकाळी सहा ते 29 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत ही वाहतूक वळवण्यात येणार आहे.

स्नानासाठी येणार्‍या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असल्यानं नाशिकच्या चारही बाजुंनी येणार्‍या गाड्यांसीठी 10-12 किमी आधीच पार्किंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पार्किंग पासून नाशिक शहरात येण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. वळवण्यात आलेली वाहतूक खालीलप्रमाणे आहे.

 हे मार्ग लक्षात ठेवा

प्रवासाचा मार्ग - मुंबईहुन धुळे, इंदोर, आग्रा जाणार्‍या वाहनांसाठी

पर्यायी मार्ग - मुंबई - कळंबोली - तळेगाव - चाकण-शिक्रापूर -अहमदनगर औरंगाबादहुन धुळ्याला पोहोचता येईल.

पुण्याहुन नाशिकमार्गे सुरत, अहमदाबादला जाणार्‍या गाड्यांसाठी

पर्यायी मार्ग - पुणे - अहमदनगर - औरंगाबाद - अजिंठा - जळगाव - साक्री नवापूर मार्गे सुरतला पोहोचता येईल.

सुरतहुन नाशिकमार्गे औरंगाबादला जाण्याचा

पर्यायी मार्ग - धरमपूर - पेठ - उमराळे - दिंडोरी - चांदवड - वैजापूर मार्गे औरंगाबादला पोहोचता येईल.

सुरतहुन सापुतारा नाशिकमार्गे पुण्याला जाणार्‍या वाहनांसाठी

पर्यायी मार्ग - सुरत - सापुतारा - वणी - पिंपळगाव चांदवड - येवला - वैजापुर -औरंगाबाद मार्गे पुण्याला पोहोचता येईल.

सटाण्याहुन नाशिकमार्गे पुण्याला जाणार्‍या वाहनांसाठी

पर्यायी मार्ग - सटाणा - येवला - वैजापुर - औरंगाबाद अहमदनगर मार्गे पुण्याला पोहोचता येईल.

नागपुरहुन जळगाव नाशिक मार्गे मुंबईला जाणार्‍या वाहनांसाठी

पर्यायी मार्ग-नागपूर-जळगाव - अजिंठा -अहमदनगर - शिक्रापुर - चाकण - एक्सप्रेसवे - कळंबोली - मुंबई

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 28, 2015, 9:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading