नारायणगावला छावणीचं स्वरूप, भूसंपादनाची मोजणी सुरू

नारायणगावला छावणीचं स्वरूप, भूसंपादनाची मोजणी सुरू

  • Share this:

naryangaon28 ऑगस्ट : जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. पुणे-नाशिक बायपाससाठीच्या भूसंपादनासाठी मोजणी सुरू आहे. आणि या मोजणीला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्तात ही मोजणी सुरू आहे. नारायणगावला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलंय.

जुन्नर तालुका हां बागायती तालुका असून आधीच विविध प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकरी यामुळे भूमीहीन होतील त्यामुळे हा बायपास रद्द करावा अशी मागणी या शेतकर्‍यांनी केलीये. नारायणगाव येथील 100 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी जमीन बाह्यवळनात जात असल्याने या शेतकर्‍यांनी 2 दिवसांपासून प्रशासनाला जेरीस आणले आहे. अनेकाची घरे आणि बागायती शेती यामध्ये जाणार असल्याने बाधित शेतकर्‍यांनी 2 दिवसांपासून रास्ता रोको आणि मोजणी थांबवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आक्रमक झाले असून मूळ रास्ता रुंदीकरण करावा किंवा उड्डाणपूल हे प्रचलित मार्ग असताना नारायणगावातच बायपासचा अट्टहास का सवाल या शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या बाह्यवळनाच्या मोजनीचा प्रस्तावित नकाशा IBN लोकमत च्या हाती लागला असून यामध्ये काही राजकीय व्यक्तींच्या जमिनी यातून वगळण्यात आल्या आहेत. शिवाय रस्ता सरळ रेषेत करण्याचा नियम असतानाही फ़क्त 7 किलोमीटर अंतरात 4 पेक्षा जास्त नागमोडी वळणं घेण्यात आली आहेत. त्यामुळे फेर सर्वे करण्यात यावा आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2015 08:45 AM IST

ताज्या बातम्या