नांदेडमध्ये अस्पृश्यतेचा कलंक कधी पुसणार?

नांदेडमध्ये अस्पृश्यतेचा कलंक कधी पुसणार?

  • Share this:

Nanded

26 ऑगस्ट : नांदेड जिल्हात सामाजिक बहिष्काराचं सत्र सुरुच आहे. काही दिवसापुर्वी गोसावी समाजाच्या काही कुटुबांवर समाजाच्याच जातपंचायतीनं बहिष्कार टाकल्याचा प्रकार आम्ही दाखवला होता. तर आता हदगाव तालुक्यातील चौरंबा या गावात आजही मातंग समाजाला हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. मातंग बांधवांना गावातिल सार्वजानिक विहिरीवर पाणी भरण्यास मज्जाव केला जातोय, तर पाणी भरण्यास आलेल्या महिलांना इथल्या गावगुंडाच्या शिविगाळ आणि मारहाणीचा सामना करावा लागत आहे.

चौरंबा या गावात हाटकर, आदिवासी आणि मातंग समाजाचे लोक राहतात.प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र विहीर आहे. दुष्काळामुळे मातंग समाजाच्या परिसरातील विहीरी आटली. त्यामुळे मातंग समाजातील महिलांना नाइलाजाने हाटकर वाड्यातील विहीरीवर पाणी भरण्यासाठी जाव लागल. मात्र या महिलांनी पाणी भरल्यास आम्ही बाटल्या जाऊ अशी भूमिका हटकर समाजातल्या लोकांनी घेतली आहे.

दरम्यान या प्रकरणी मनाठा पोलिसांनी नागरी हक्क कायदा , आणि अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुण 10 जणांना अटक केली. सध्या गावात तणाव असून मातंग समाजातील लोक प्रचंड दहशतीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 26, 2015, 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading