कॉल ड्रॉप्सला वैतागलात ?, कमेंट करा

  • Share this:

ibn lokmat NoCallDdops26 ऑगस्ट : नो कॉल ड्रॉप्स मोहिमेच्या यशानंतर आयबीएन नेटवर्क पुन्हा एकदा या मोहिमेला सुरुवात करत आहे. जूनमध्ये घेण्यात आलेल्या मोहिमेला प्रेक्षक/वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. आता या मोहिमेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून या समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे. तुम्हीही कॉल ड्रॉप्सला वैतागला असाल तर खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा...तुम्हाला आलेले अनुभव शेअर करा...सेकंद सेकंदाचे पैसेखाऊ कंपन्यांना काही सूचना द्यायच्या असतील त्याही तुम्ही नोंदवू शकता...

का होतो कॉल ड्रॉप ? ,काॅल ड्राॅप म्हणजे काय?

तुम्ही कोणत्याही टेलिकॉम कंपनीचं नेटवर्क वापरत असाल. प्रत्येक टेलिकॉम कंपनीकडून तुम्हाला आकर्षक असा कॉलरेट प्लॅन दिला जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला 1 रु. प्रतिमिनिट कॉल रेट आहे. तुम्ही जेव्हा फोनवर बोलता तेव्हा 30 किंवा 40व्या सेकंदाला फोन कट होतो (म्हणजे कॉल ड्रॉप होतो). यामुळे होतं असं की, तुम्ही देता एक रुपया पण बोलता फक्त 40 सेकंद...त्यानंतर पुन्हा कॉल करता आणि पुन्हा 1 रुपया कंपनीला देता. म्हणजे तुमचं बोलणं जर एक मिनिटभराचं असेल तर तुम्हाला 2 रुपये मोजावे लागतात. बरं हेच नाही...हाच कॉल ड्रॉप 1 मिनिट 10 सेकंद किंवा 5 सेकंद असाही कट होतो. त्यामुळे तुम्हाला एका कॉलचे मोजावे लागता 2 रुपये...अशा प्रकारे टेलिकॉम कंपन्या तुम्हाला त्रास तर देतातच आणि तुमची जाहीरपणे लूटही करतात. तुमच्या मेहनतीचे पैसे तुमच्या डोळ्यादेखत कंपन्या कॉल ड्रॉपच्या नावाखाली सहज लुटतात.

त्यामुळेच आम्ही सुरू केलीय खास मोहीम #NoCallDrops... तुम्हीही या मोहिमेत सहभागी होऊ शकता... फेसबुक, ट्विटरवर कमेंट करताना वापरा हॅशटॅग #NoCallDrops

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 26, 2015, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading