कांद्याची आवक वाढली, भाव पडले

कांद्याची आवक वाढली, भाव पडले

  • Share this:

444onion_nasik

25 ऑगस्ट : कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समितीत आज कांद्याचे भाव 5 हजार 490 रु. प्रतिक्विंटल रुपये झाले आहेत, शनिवारी हेच दर 6 हजार 300 रुपये इतके होते. नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये हीच परिस्थिती असून आवक वाढल्याने भाव घसरल्याचे सांगण्यात येत आहे.

लासलगाव सोबतच मनमाडच्या बाजार समितीतही कांद्याचे भाव कोसळले. त्यातच इजिप्त आणि पाकिस्तान मधून कांदा आयात केला जातोय. शिवाय शेतकरी आणि व्यापार्‍यांकडे असलेला कांदाही बाजारात येतोय. पण पुढे कांद्याचे भाव स्थिर राहतील, असा विश्‍वास व्यापार्‍यांना वाटतोय. कांद्याचे भाव पडले असले तरी ग्राहकांना मात्र कांदा चढ्या भावाने खरेदी करावा लागतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 25, 2015, 6:32 PM IST

ताज्या बातम्या