पिकनिक, बलात्काराचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला

पिकनिक, बलात्काराचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला

  • Share this:

mumbra car accident25 ऑगस्ट : ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा येथे राहणार्‍या 17 वर्षीय युवतीला फिरायला जाण्याच्या बहाण्यानं चालत्या वाहनामध्ये मित्रानेच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीये. एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही तिच्या दोन मित्रांनी मैत्रिणीच्या सहाय्याने या तरुणीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला करून अपघात झाल्याचा बनाव देखील केला आहे.

या तथाकथित निर्दयी मित्रांनी जखमी अवस्थेत या युवतीला मुंबई पुणे हायवेवर सोडून देण्यात आलं. गाडीचा अपघात झाला असं दाखवण्याच्या प्रयत्नात गाडीही तिथेच सोडली. ही घटना एक आठवड्या पूर्वीची आहे. खालापूरच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाल्यावर हा प्रकार समोर आला. डॉक्टरांनी तिच्या घरी फोन केला, तेव्हा तिच्या घरच्यांना हे सर्व समजलं.

सध्या तिच्यावर मुंबईच्या केईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुदैर्वानं तिची परिस्थिती सध्या गंभीर आहे. या संपूर्ण प्रकारचा तपास खालापूर पोलीस आणि मुंब्रा पोलीसही करत आहेत. या प्रकरणी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2015 09:39 AM IST

ताज्या बातम्या