सेन्सेक्स 1700 अंकानी गडगडला, गेल्या 7 वर्षांतील सर्वात मोठी घसरण

  • Share this:

sensex down423

24 ऑगस्ट : मुंबई शेअर बाजारात आज खूप मोठी घसरण पहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात गेल्या 7 वर्षांतील ऐतिहासिक घसरण झाली. सोमवारी दिवसभरात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 1624.51 अंशांनी घसरून 25,741.56 वर बंद झाला. निफ्टीसुद्धा 490.95 अंशांनी घसरण होऊन 7809 वर बंद झाला. 24 ऑक्टोबर 2008 नंतर ही सेन्सेक्समधील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

शुक्रवारी अमेरिकन बाजारपेठेत झालेल्या घसरणीनंतर आशियाई बाजारपेठांवरही परिणाम झाला. रुपयाच्या तुलनेत एका डॉलरची किंमत 66 रुपये 48 पैशांवर पोहचली आहे.

या सर्वांचं मुख्य कारण आहे ते चीननं आपल्या चलनाचं अवमूल्यन केलं हे. गेल्या आठवड्यात चीननं युआनची किंमत कमी केली. त्यामुळे दक्षिण आशियातल्या सर्व शेअर बाजारांमध्ये घसरण पहायला मिळतेय. कारण चीनमधली आणि जवळच्या इतर देशांमधली आपली अवांतर गुंतवणूक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार काढून घेत आहेत.

दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुंतवणुकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांनी घाबरण्याचं कारण नाही, असं जेटली म्हणाले. तर परदेशी बाजाराच्या तुलनेत भारतीय बाजार मजबूत स्थितीत असल्याची ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. मुंबईत आयबीए आणि फिक्कीनं आयोजित केलेल्या बँकिंग परिषदेत ते बोलत होते. देशात सध्या 380 अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी आहे. आणि गरजेच्या वेळी ती वापरणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढची एक किंवा दोन वर्षं कच्च्या तेलाच्या किंमती कमीच राहतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2015 05:59 PM IST

ताज्या बातम्या