24 ऑगस्ट : पाण्यावरून लातूर विरुद्ध सोलापूर असा वाद पेटला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पंढरपूरमधून रेल्वेने पाणी आणलं जाणार असल्यची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, पंढरपूरहून लातूरला पाणी नेण्याच्या या योजनेला सोलापूर काँग्रेस नेत्यांनी विरोध केला असून, रक्त सांडू, पण सोलापूरचा एकही पाण्याचा थेंब लातूरला जाऊ देणार नाही, असा इशारा सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिला आहे.
लातूरमध्ये आत्तापर्यंत केवळ 15.6 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यावर तोडगा म्हणून पंढरपूरहून रेल्वेच्या वॅगनद्वारे पाण्यासाठी आतुरलेल्या लातूरला पाणीपुरवठा करण्याची विनंती उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र, पाण्याच्या प्रश्नावरून जिल्हा काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. पंढरपूरहून लातूरला रेल्वेने पाणी नेण्याचा विचार सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. 'जर का लातूरला पाणी सोडले तर आमच्या रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता पाण्यावरून रणकंदन माजण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |