पराभवाची परतफेड, भारताचा लंकेवर 'विराट' विजय

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2015 02:19 PM IST

पराभवाची परतफेड, भारताचा लंकेवर 'विराट' विजय

24 ऑगस्ट : पहिल्या टेस्टमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर अखेर भारताने कमबॅक केलंय. श्रीलंकाचा डंका वाजवत भारताने दुसरी दुसरी टेस्ट मॅच खिश्यात घातलीये. भारतानं कोलंबो टेस्ट मॅच भारतानं चौथ्या दिवशीच 270 रन्सनं जिंकली आहे. विराट कोहली याचा कॅप्टन म्हणून हा पहिला टेस्ट विजय आहे.. त्यामुळे विराटसाठी ही मॅच ऐतिहासिक ठरलीय.

भारतीय टीमने 325 धावांचा डोंगर उभा करत आपली दुसरी इनिंग जाहीर केली. भारताने लंकनं टीमसमोर चौथ्या दिवशी 413 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. विशेष म्हणजे, मागील टेस्टमध्ये श्रीलंकेच्या स्पिन बॉलर्सनी भारतीय टीमला जेरीस आणलं होतं. त्याची परतफेड करत यावेळी भारतानंही श्रीलंकेला स्पिननंच गारद केलं. रविचंद्रन अश्विननं मॅचमध्ये एकूण 12 विकेट घेतले. त्याला चांगली साथ मिळाली ती उमेश यादव, इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांची. श्रीलंकेची टीम दुसर्‍या इनिंगमध्ये अवघ्या 134 रन्सवर ऑल आऊट झाली. श्रीलंकेचे सर्व फलंदाज भारतापुढे टिकू शकले नाहीत. फक्त करुणरत्नेनं 46 रन्सची एकाकी झुंज दिली. पण त्यालाही अश्विनसमोर आपली विकेट टाकावीच लागली. अश्विनने या आतापर्यंतच्या या सिरीजमध्ये 17 विकेट घेतल्या आहे. या विराट विजयासह तिसर्‍या टेस्टसाठी भारतीय टीमचा आत्मविश्वास आता नक्कीच वाढलेला असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2015 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close