गेला मान्सून कुणीकडे, सप्टेंबर महिनाही कोरडाच जाणार ?

गेला मान्सून कुणीकडे, सप्टेंबर महिनाही कोरडाच जाणार ?

  • Share this:

no rain maharashtra24 ऑगस्ट : अख्खा ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेला...आणि आता सप्टेंबर महिनाही तसाच जाण्याची चिन्हं आहेत. सप्टेंबर महिन्यात फक्त 84 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.

ऑगस्टमध्ये आतापर्यंत 90 टक्के पाऊस झालाय. हवामान खात्याची या अंदाजामुळे दुष्काळाच्या चिंतेत भर पडलीय. अगोदरच अपुर्‍या पावसामुळे बळीराजा हवालदिल झालाय. त्यातच पावसाचा शेवटचा महिना म्हणून बघितला जाणारा सप्टेंबर महिनाही कोरडा गेला, तर शेतीवर अस्मानी संकट येईल. दरम्यान, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनुसार येत्या काही दिवसांत थोडासा पाऊस पडेल, पण मुसळधार आणि सलग पावसाची शक्यता कमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 24, 2015, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading