शेअर बाजार गडगडला, सेंसेक्समध्ये एक हजारांनी घसरण

  • Share this:

sensex down42324 ऑगस्ट : अमेरिकेच्या मार्केट आणि चीन मार्केटमध्ये झालेल्या घसरणीचे पडसाद आशियाई मार्केटमध्ये उमटले आहे. या घसरणीचा फटका भारतीय शेअर मार्केटला बसलाय. आज मुंबई शेअर मार्केटमध्ये तब्बल 1000 हजारांची घसरण झालीये. तर निफ्टी 8300 च्या खाली आलाय. बाजाराची सुरुवात होताच सेंसेक्स 26,359.53 च्या खाली आला. तर निफ्टी 7,9909 पर्यंत पोहचला. सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये 3.5 आणि 3.5 घसरण झाली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमार्केटमध्ये सर्वाधिक घसरण झालीये. सीएनएक्स मिडकॅप इंडेक्स जवळपास 4 टक्के गडगडलाय. रिअल्टी, बँकिंग आणि ऑटो शेअरमध्ये चांगलीच घसरण झालीये. बीएसईच्या रिअल्टी इंडेक्स 4.9 टक्के आणि ऑटो इंडेक्समध्ये 4 टक्के घसरण झालीये. बँक निफ्टी 3.8 टक्के घसरण होऊन 17,400 खाली आलाय. या दरम्यान, यस बँक, वेदांता, एक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, टाटा मोटर्स, गेल आणि आयसीआयसीआय बँक या सारख्या कंपन्यांचे शेअर 6.8 ते 4.75 टक्क्यांवर आलाय. मिडकॅप शेअरमध्ये वक्रांगी, ओसीएल इंडिया, एसकेएस माइक्रोफायनान्स, हेक्सावेअर आणि केईसी इंटरनॅशनल कंपन्यांचा सर्वाधिक 15.2 ते 7.8 टक्के घसरण झालीये.

बाजार का गडगडला

- चीन शेअऱ मार्केटमध्ये 8.5 टक्के घसरण

- अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये 3.5 टक्के घट

- आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किमती कमी, 40 डॉलर प्रती बॅरल

रुपयाही घसरला

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भावही घसरला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच रुपया कमजोर झालाय. डॉलरच्या तुलनेच रुपया 66.50 पर्यंत पोहचलाय. डॉलरच्या तुलनेत रुपया 64 पैसे म्हणजे 1 टक्का घसरलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 24, 2015, 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading