कोकणातल्या केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध

  • Share this:

Shiv Sena MLA's

23 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात प्लॅस्टिक तर कोकणात केमिकल झोन उभारलं जाईल, अशी घोषणा नुकतीच केली आहे. मात्र शिवसेनेने प्रदूषणकारी रासायनिक उद्योग कोकणात उभारण्यास विरोध दर्शविला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात केमिकल झोन झाल्यास प्रदूषण वाढेल, असं मत व्यक्त करत शिवसेनेचा अशा प्रकल्पांना विरोध असल्याचं रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

नागपूरमध्ये झालेल्या समारंभात मुख्यमंत्र्यांनी कोकणात केमिकल झोन उभारणार असल्याची घोषणा केली. त्याची शिवसेनेमध्ये लगेच प्रतिक्रिया उमटली आहे. प्रदूषणाच्या मुद्दयावरच शिवसेनेचा कोकणात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध आहे आणि अशा वेळी आणखी रासायनिक उद्योग उभारला गेला तर शिवसेनेला राजकीयदृष्टया अडचणी निर्माण होणार आहेत. आधीच काही रासायनिक उद्योगांमुळे कोकणातल्या मच्छीमारीवर परिणाम झाला तसंच आसपासच्या परिसरात प्रदूषणाचा त्रास होतो. त्यातच जर आणखी रासायनिक उद्योग उभारण्यात आले तर कोकणातलं पर्यावरणच धोक्यात येईल आणि मुळात कोकणात अशा प्रकल्पांची गरज नसल्याचं, विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 23, 2015, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading