S M L

श्रृती कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित

Sachin Salve | Updated On: Aug 21, 2015 11:13 PM IST

shruti sister23221 ऑगस्ट : श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सिडको पोलीस स्टेशनचे एएसआय राजू वैष्णव आणि जमादार हिवाळे यांचं निलंबन केलंय.

छेडछाडीला वैतागूनऔरंगाबादच्या श्रुती कुलकर्णीनं आपलं आयुष्य संपवलं. श्रुती ही 22 वर्षांची एमबीएची विद्यार्थीनी होती. स्वप्नील मणियार या तरुणाचं श्रुतीवर एकतर्फी प्रेम होतं. स्वप्नील श्रुतीसोबत पदवीपर्यंत कॉलेजला होता. श्रुतीने त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण स्वप्नील तिची छेडछाड करायचा, अश्लील मेसेज पाठवायचा, पैशाचं आमिष दाखवून तिच्यावर लग्न कर म्हणून जबरदस्तीही करायचा. अखेर या जाचाला कंटाळून श्रुतीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. श्रुतीनं याबद्दल घरच्यांना सांगितलं होतं. तिने आणि तिच्या कुटुंबियांनी याबद्दल पोलिसांकडे तक्रारही केली होती. पण पोलिसांनी या स्वप्निलवर छेडछाडीची गंभीर कलमं लावली नाहीत आणि तो जामिनावर सुटला.

स्वप्निल मणियारवर कोणते गुन्हे लागू शकतात ?- छेडछाड

- विनयभंग

- अश्लील वर्तन

Loading...

- छळवणूक

- श्रृती आत्महत्या प्रकरण सुरुवातीला लावलेली कलमं - 354 आणि 354(ड)

- मृत्यूनंतर लावण्यात आलेली कलमं - आयपीसी 306 , 66(क)

- आयटी अँक्ट -दोषी पोलीस कर्त्यव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलिसांवर कारवाई होवू शकते

- प्रकरणात जबाबदार असलेल्या ASI ला सहआरोपी केल्या जावू शकते.

तक्रारीनंतर काय घडलं ?

27 जुलै - श्रुतीच्या कुटंुबीयांनी केली तक्रार

3 ऑगस्ट - धमक्या आणि छेडछाड प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा

17 ऑगस्ट - स्वप्निलला अटक आणि जामिनावर सुटका

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2015 11:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close