जनावरांना चारा मिळत नसल्यामुळे शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

जनावरांना चारा मिळत नसल्यामुळे शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

  • Share this:

solapur faramar suside21 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यात एका शेतकर्‍याने गुरांना चारा मिळत नसल्याच्या नैराश्यापोटी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तानाजी दत्तु पवार असं या पीडत शेतकर्‍यांचं नावं आहे. तानाजी पवारांची स्थिती गंभीर असून जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण या गावचे हे शेतकरी आहेत.

गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी, चार्‍याचा प्रश्न गंभीर झालाय. मात्र प्रशासन यावर कोणतीही भूमिका घेत नाही. तानाजी पवारांची स्थिती गंभीर असून जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. कळमण गावात पवारांची 4 एकर शेती आहे. मात्र पाऊस नसल्याने शेतात काडी देखील उगवलेली नाही. गुरांना खायला चारा नसल्याने चिंतीत झालेल्या तानाजी पवार यांनी रोगर हे विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 21, 2015, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading