पाकिस्तानमध्ये सैफच्या 'फॅण्टम'वर बंदी

 पाकिस्तानमध्ये सैफच्या 'फॅण्टम'वर बंदी

  • Share this:

phantom

21 ऑगस्ट : सैफ अली खान आणि कतरिनाची प्रमुख भूमिका असलेल्या 'फॅण्टम'वर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. मुंबईवर 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-ऊद-दावाचा प्रमुख हफीज सईद याने 'फॅण्टम'विरोधात लाहोर हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

26/11 हल्ल्यावर भाष्य करणार्‍या 'फॅण्टम' या चित्रपटात माझ्या आणि माझ्या संस्थेविरोधात चुकीची माहिती देण्यात आली आहे, असा आरोप हाफिज सईदने केला होता. लाहोर हायकोर्टाचे न्यायाधीश शाहीद बिलाल हसन यांनी सईदचे वकील आणि सरकारची बाजू ऐकल्यानंतर पाकिस्तानत 'फॅण्टम'वर बंदी घालण्याचा निर्णय दिला.

लेखक-पत्रकार हुसैन झैदी यांच्या 'मुंबई अव्हेंजर्स' या कादंबरीवर आधारित फॅण्टम हा सिनेमा आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासह जागतिक दहशतवादावर हा सिनेमा भाष्य करतो. पण चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खाननं यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. माझा चित्रपट दहशतवाद विरोधी आहे, पाकिस्तानविरोधी नव्हे, असं कबीरचं म्हणणं आहे.

याआधीही पाकिस्तानत सैफअली खानच्या एजंट विनोद आणि सलमान खानच्या एक था टायगर रिलीज करण्यास बंदी आणली होती.फॅण्टम हा सिनेमा पुढच्या शुक्रवारी रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 21, 2015, 8:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading