काँग्रेसचं उद्यापासून पर्दाफाश आंदोलन - अशोक चव्हाण

काँग्रेसचं उद्यापासून पर्दाफाश आंदोलन - अशोक चव्हाण

  • Share this:

ashok chavan

21 ऑगस्ट : राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेस आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत. येत्या 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान राज्यात काँग्रेस पर्दाफाश आंदोलन करणार आहे. राजीव गांधी सद्भावना दौडच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काल (गुरूवारी) कोल्हापूरमध्ये आले होते, त्यावेळी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना सरकार दीर्घकालीन उपाययोजना करण्याची फक्त घोषणा करत आहे. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात कोणातेही ठोस उपाययोजना केले जात नाहीये. शेतकर्‍याला कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी सरकार काही करत नाही ही दुदैर्वाची बाब असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली. याचबरोबर चव्हाणांनी केंद्रात आणि राज्यातही ललित मोदी , व्यापम घोटाळा या आणि इतर प्रकरणांमध्ये सरकार मंत्र्यांचे राजीनामे का घेत नाही याचा खुलासा करण्याची मागणीही केली. याच सगळ्या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रस उद्यापासून पर्दाफाश आंदोलन करणार आहे.

दरम्यान, एफटीटीआय आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले, सरकार विद्यार्थ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना न्याय न देता सरकार विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करत आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 21, 2015, 7:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading