आव्हाड तर 'लखोबा लोखंडे', दहीहंडीवरुन 'संघर्ष'

आव्हाड तर 'लखोबा लोखंडे', दहीहंडीवरुन 'संघर्ष'

  • Share this:

sarnaik on awadha20 ऑगस्ट : राज्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीची संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द केली आहे. ऑगस्ट महिना उलटला तरीही राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळेच यंदा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं. आव्हाड यांची दहीहंडी 'संघर्ष' या नावाने ओळखली जाते. परंतु सदरचा निर्णय आव्हाडांचा असला तरी आव्हाड 'तो मी नव्हेच' मधले 'लखोबा लोखंडे' असल्याची टीका सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तर निर्णय आव्हाड यांचा वैयक्तिक असला तरी उत्सव साजरा होणार असे ठाण्यातील गोविंदा पथकांनी सांगितलंय. तर उत्सव करत असतांना सरकार आणि न्यायालयाचे नियम पाळले जातील असं सांगितलंय.

प्रसिद्ध असलेल्या काही दहीहंड्यांपैकी एक म्हणून 'संघर्ष'कडे पाहिलं जातं. करोडो रुपयांचा खर्च आणि मोठमोठ्या बक्षिसांसाठी 'संघर्ष'ची दहीहंडी प्रसिद्ध आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दहीहंडीवेळी वारेमाप पाण्याचा वापर होतो. मात्र आव्हाडांनी यंदा दहीहंडीच रद्द केल्याने पाण्याची उधळपट्टी थांबणार आहे. राज्यातील दुष्काळजन्या परिस्थिती लक्षात घेवून ठाण्यातील संघर्ष या सेवाभावी संस्थेनं यंदाचा दहीकाला उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळ जाण्या परीस्थिती लक्षात घेवून यंदा उत्सवाचा निधी राज्यातील एका गावाला देणार असल्याच सांगितलं आहे. तसंच ठाण्यातील काही गोविंदा पथकांनी गेल्या वर्ष उत्सव रद्द केल्याबदल विचारलं असता आव्हाडांनी मला कुणाचे अनुकरण करण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान हा प्रकार म्हणजे एक नाटक आहे असे ठाण्यातील सेनेचे आमदार आणि संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. राज्यात गेल्या वर्षीही दुष्काळ नव्हता का असा सवालही सरनाईक यांनी विचारून 'तो मी नव्हेच' मधील 'लखोबा लोखंडे' आव्हाड असल्याचे सांगून न्यायालयाचे आदेश पाळून आम्ही आमची संस्कृती जपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार असं सरनाईक यांनी सांगितलं. आम्ही सरकारचे निर्णय पाळून उत्सव साजरे करू असं आयोजकांनी सांगितलंय

ठाण्यातील संघर्ष या सेवाभावी संस्थेने यंदाची दहीहंडी रद्द केल्यामुळे काहीशी ठाण्यातील गोविंदा पथकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करणार असल्याचं सांगितलंय. सरकारचे नियम अथवा निर्बंध जरी आडवे येत असले तरी यंदा गोविंदा पथक उत्सव साजरा करतील त्यातूनच सरकार ने काही अटी अथवा निर्बंध रद्द केले नाही तर वेळेप्रसंगी मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांच्या घरासमोर थर रचून उत्सव साजरा करू असा इशारा देखील ठाण्यातील नाराज गोविंदा पथकांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 20, 2015, 9:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading