दुष्काळामुळे जितेंद्र आव्हाडांकडून 'संघर्ष' दहीहंडी रद्द

दुष्काळामुळे जितेंद्र आव्हाडांकडून 'संघर्ष' दहीहंडी रद्द

  • Share this:

Jitendra awahd

20 ऑगस्ट : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'संघर्ष' या मंडळातर्फे साजरा करण्यात येणारा दहीहंडीचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑगस्ट महिना संपला तरी राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळेच यंदाची 'संघर्ष'ची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती 'संघर्ष'चे आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी आज (गुरुवारी) दिली.

ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या 'संघर्ष' या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंडळाचा दहीहंडी उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. तसंच सेलिब्रेटींचीही गर्दी असते. पण, यंदा असं काहीच दिसणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2015 02:53 PM IST

ताज्या बातम्या