News18 Lokmat

महाराज आज असते तर विरोधकांचा कडेलोट केला असता -मुख्यमंत्री

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2015 10:22 PM IST

महाराज आज असते तर विरोधकांचा कडेलोट केला असता -मुख्यमंत्री

19 ऑगस्ट :  वाद घालण्यार्‍यांना शिवाजी महाराज कळलेच नाही. वाद घालणार्‍या लोकांनी छत्रपती शिवरायाचं कार्य समजून घ्यावं आणि मग बोलावं. आज जर शिवाजी महाराज असते तर विरोध करणार्‍यांचा कडेलोट केला असता अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मोठ्या दिमाखात महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर चांगलाच आसूड ओढला. बाबासाहेबांना पुरस्कार दिल्यानं पुरस्काराची उंची वाढली आहे. आम्ही कुणाच्या भीतीमुळे राजभवनात पुरस्कार सोहळा घेतला नाही. मुळात शिवरायांच्या मावळ्यांना कुणाची भीती वाटण्याची गरजच नाही. सर्वोच्च पुरस्कार हे राजभवनातच व्हावेत ही प्रथा आहे. मुळात वाद घालण्यार्‍यांना शिवाजी महाराज कळलेच नाही. वाद घालणार्‍या लोकांनी छत्रपती शिवरायाचं कार्य समजून घ्यावं आणि मग बोलावं. आज जर शिवाजी महाराज असते तर विरोध करणार्‍यांचा कडेलोट केला असता अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक आणि व्यवस्थापक होते. महाराजांच्या या गुणांवर चित्रपट किंवा मालिका काढणार्‍यांना राज्य सरकार पूर्ण मदत करणार असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2015 10:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...