राडा सुरूच; शरद पवारांचा पुतळा जाळला, राज ठाकरेंच्या पोस्टरला काळं फासलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2015 05:24 PM IST

राडा सुरूच; शरद पवारांचा पुतळा जाळला, राज ठाकरेंच्या पोस्टरला काळं फासलं

mns vs ncp protest19 ऑगस्ट : आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान होणार आहे. पण महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात आंदोलनं सुरूच आहे. पुरस्कारला विरोध करत राष्ट्रवादी, मनसे आणि जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा पुतळा जाळला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या पोस्टरला काळं फासलंय.

तावडेंच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं

राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर जिजाऊ ब्रिगेडनं आंदोलन केलं. संध्याकाळी होणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण सोहळा थांबवण्याची त्यांनी मागणी केली. जिजाऊ ब्रिगेडच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी तावडेंच्या निवासस्थानात स्वत:ला कोंडून घेतलं. जिजाऊ ब्रिगेडच्या या आंदोलनंतर सर्वच मंत्र्यांच्या बंगल्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच मंत्र्यांच्या बंगल्यांचे प्रवेशद्वार केलं.

शरद पवारांचा पुतळा जाळला, राज ठाकरेंच्या पोस्टरला काळं फासलं

मुंबईत लालबाग येथील भारतमाता सिनेम जवळ मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा निषेध करत त्यांचा पुतळाही जाळला होता. त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लालबाग येथील मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या ऑफिस बाहेर निदर्शनं केली. त्यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्टरला काळं फासुन पुतळ्याचं दहन केलं. पोलिसांनी कारवाई करत निदर्शने करणार्या सर्व महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2015 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...