पुरंदरेंविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

  पुरंदरेंविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

  • Share this:

mumbai high court43419 ऑगस्ट : बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीये. या याचिकेला काहीच अर्थ नाही असं स्पष्टपणे नमूद करत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावलीये. त्यामुळे बाबासाहेबांना देण्यात येणार्‍या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या मार्गातला अडथळा दूर झालाय.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. जस्टीस नरेश पाटील आणि ए बी शुक्रे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पुरंदरेंचं काम तुम्हाला पुरेसं वाटतं नाही का सवाल न्यायाधिशांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना केला आहे. पुुरंदरेंनी राज्यासाठी काहीच केलं नाही असं आपल्याला वाटतं का असंही न्यायाधिशांनी याचिकाकर्त्यांना विचारलं आहे. इतकंच नाही तर पुरस्कार जाहीर होऊन इतके दिवस झाले, मग ही याचिका दाखल करायला एवढा वेळ का ? सगळ्या मीडियाचे आणि राजकारण्यांचे याकडे लक्ष आहे. त्यामुळे पुरस्कार वितरणादिवशी हा विषय जाणीवपूर्वक आणला गेला का ? मग हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे का ? असा युक्तिवाद सरकारी वकील अनिल सिंग यांनी केलाय. अखेर उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलीये. राहुल पोकळे आणि विश्वनाथ कांबळे यांनी ही याचिका दाखल केली होती. कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून कोर्टाने याचिकाकर्त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 19, 2015, 1:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading