बाबासाहेबांना हात लावला तर महाराष्ट्रात तांडव करीन- राज ठाकरे

बाबासाहेबांना हात लावला तर महाराष्ट्रात तांडव करीन- राज ठाकरे

  • Share this:

raj thackaey pc

18 ऑगस्ट : बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला होत असलेल्या विरोधामागे शरद पवार यांचेच गलिच्छ राजकारण कारणीभूत असून, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजपातील काही मंडळींही जाणिवपूर्वक या वादाला खतपाणी घालत असल्याची घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ब्राम्हण मुख्यमंत्री झाल्यामुळेच हे असले घाणेरडं राजकारण खेळलं जात असल्याची तोफही त्यांनी डागली. त्याचबरोबर बाबासाहेबांना हात लावाल तर याद राखा, महाराष्ट्रात तांडव उभं करेन असा इशाराही राज ठाकरेंनी पुरंदरे विरोधकांना दिला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेबांच्या पुरस्काराला विरोध करणार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासूनच राज्यात जाती पातीच्या घाणेरडय़ा राजकारणाला सुरूवात झाली. बाबासाहेब पुरंदरेंचा चार वेळा सत्कार करणार्‍या शरद पवारांना आताच बाबासाहेबांचे शिवचरित्र वादग्रस्त असल्याचे कळले काय?. शिवाजी महाराज आणि जिजाऊ मॉसाहेबांचा अपमान केला म्हणून बाबासाहेबांचा सत्कार केला होता काय?, असा खडा सवालही ठाकरे यांनी पवारांना विचारला.

भालचंद नेमाडे यांच्यासारख्या ज्ञानपीठ विजेत्या विद्वानालाही आताच विरोध करावासा वाटला काय. ज्ञानपीठ विजेत्याने कसे वागायचे याचे धडे कुसुमाग्रज आणि विंदा यांच्याकडून घ्यावेत, असा खोचक सल्लाही ठाकरे यांनी नेमाडे यांना दिला. बाबासाहेब हे निमित्त असून, ब्राम्हण मुख्यमंत्री झाल्यानंतरच काहींना पोटशूळ

उठला. त्यातूनच महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा चिखल करून टाकला. या वादामागे भाजपाच्याही काही मंत्र्यांचा हात असल्याचा घणाघाती आरोपही ठाकरे यांनी केला.

बाबासाहेबांसारख्या 92 वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तींवर आक्षेप नोंदवताना यांना शरम वाटायला पाहिजे होती, असे सांगतानाच बाबासाहेबांना हात लावाल तर याद राखा महाराष्ट्रात तांडव उभे करीन, असा गर्भित इशाराही ठाकरे यांनी दिला. पुस्कारावरून सुरू असलेल्या वादावर मुग गिळून गप्प असलेल्या राज्य सरकारवरही ठाकरे यांनी सडकून टीकास्त्र सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 18, 2015, 11:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading