17 ऑगस्ट : महाराष्ट्र भूषणच्या वादात आता उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतलीये. बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भुषण पुरस्कार स्थगित ठेवा अशी मागणी खासदार उदयन राजे भोसले यांनी केलीये.
उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार वादावर एक पत्रक प्रसिद्ध केलंय. बाबासाहेबांच्या लिखाणाबद्दल जाहीरपण आक्षेप घेतले जात आहे. त्यामुळे ही बाब आम्हाला अत्यंत वेदनादायी झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत पुरस्कार स्थगिती ठेवावा अशी मागणी केलीये.
शासनाने शिवराय आण जिजाऊआईसाहेब यांचे विषयी असलेल्या कृतीशील भावनेचे विकृतीकरण होवून नये आणि जनतेच्या रास्ता भावनेचा अनादर होवू नये म्हणून, पुरंदरेंच्या लिखानाची तपासणी करावी. लेखन आक्षेपांचे निरसन होईपर्यंत हा पुरस्कार प्रदान करू नये असंही राजेंनी स्पष्ट केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा