'महाराष्ट्र भूषण'बद्दल पुनर्विचार करा, अजितदादांचा यू-टर्न

  • Share this:

nasik_ajit_pawar17 ऑगस्ट : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना आता दोन दिवसांत महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पण, दुसरीकडे या पुरस्काराच्या विरोधात विरोधक अधिक आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीने आता पुरंदरेंच्या पुरस्कार देण्यावरून विरोध दर्शवलाय. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या प्रतिकूल प्रतिक्रियेनंतर आज अजित पवारांनीही आपल्याच वक्तव्यावरून घुमजाव केलंय.

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला होता. पण, अजित पवारांनी आव्हाडांची कानउघडणी केली होती. आव्हाडांचे मत हे पक्षाचे मत नाही. पुरंदरेंना पुरस्कार दिला जातो याचं स्वागत आहे अशी भूमिका अजिदादांनी मांडली होती. पण, काका शरद पवार यांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे अजित पवारांना माघार घ्यावी लागली. पुरस्काराचे जाहीर स्वागत करणारे अजितदादाही आता पुरस्काराबाबत पुनर्विचार व्हावा अशी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषणला होणारा वाढता विरोध लक्षात घेता राज्य सरकारने हा पुरस्कार देण्याबाबतच पुन्हा विचार करावा अशी भूमिका आता अजित पवारांनी घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2015 08:51 PM IST

ताज्या बातम्या