राज्यात 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

राज्यात 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

 • Share this:

Mungantiwarafsaf

17 ऑगस्ट : राज्यात नवीन जिल्हा आणि तालुक्यांच्या निर्मितीबाबत प्रस्ताव आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये अर्थ, महसूल, महसूल, नियोजन विभागाचे सचिव आणि विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश आहे. या समितीचा अहवाल डिसेंबरअखेर अपेक्षित आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच सरकार योग्य तो निर्णय घेईल', अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

'देशात लोकसंख्या वाढीनुसार मतदारसंघांची फेररचना होते. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारे नवे जिल्हे आणि तालुके निर्माण होण्यास काहीच हरकत नाही. अधिकारांचे विकेंद्रीकरण आणि प्रशासनाला लोकापर्यंत पोहोचण्यासाठी हे आवश्यक आहे. राज्यात 22 नवे जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीसंदर्भातील अंतिम निर्णय मुख्य सचिवांच्या अहवालानंतरच घेतला जाईल', अशी माहिती मुनगंटीवार यांनी रविवारी नागपुरात वन विभागाच्या 'वनधन जनधन' योजनेच्या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना दिली.

एक राजकीय कार्यकर्ता म्हणून नवीन जिल्हे व तालुक्यांच्या निर्मितीसाठी मी अनुकूल आहे. लोकसंख्येच्या आणि गुणवत्तेच्या आधारावर नवीन जिल्हे करण्यात काही गैर नाही. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तालुक्याची निर्मिती असेल किंवा गडचिरोलीमधील अहेरीला जिल्ह्याचा दर्जा देणे असेल, गरजेनुसार असे निर्णय घेतले जावेत. अधिकारांच्या विकेंद्रीकरणातून स्थानिकांनाही न्याय देणे शक्य होतो, असेही मुनगंटीवार म्हणाले.

नवीन प्रस्तावित जिल्हे

 • मूळ जिल्हा - नवीन जिल्हा
 • बुलडाणा - खामगाव
 • यवतमाळ - पुसद
 • अमरावती - अचलपूर
 • चंद्रपूर - चिमूर
 • गडचिरोली - अहेरी
 • जळगाव - भुसावळ
 • लातूर - उदगीर
 • बीड - अंबेजोगाई
 • नांदेड - किनवट
 • अहमदनगर - शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
 • नाशिक - मालेगाव, कळवण
 • सातारा - मानदेश
 • पुणे - शिवनेरी
 • पालघर- जव्हार
 • ठाणे - मीरा भाईंदर, कल्याण
 • रत्नागिरी - मानगड
 • रायगड - महाड

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2015 09:16 AM IST

ताज्या बातम्या