...अन् चिमुकला जीत बनला पोलिसवाला !

...अन् चिमुकला जीत बनला पोलिसवाला !

  • Share this:

jeet bhanushali15 ऑगस्ट : वाशी पोलीस स्टेशनमध्ये आजचा झेंडावंदनाचा सोहळा काहीसा आगळावेगळा आणि भावुक होता. या पोलीस स्टेशनचा आजचा इन्चार्ज होता चिमुकला जीत.

11 वर्षांच्या जीत पोलीस गणवेशात पोलीस ठाण्यात आला. ऐटीत खुर्चीत बसला, त्याने ठाण्याच्या कामकाजाबद्दल माहिती घेतली, पिस्तूलही हाताळली. आणि नंतर झेंडावंदनाचा मुख्य सोहऴाही जीतच्या हातून पार पडला. हे सर्व पाहतांना जीतच्या आईचे डोळे भरुन आले. नवी मुंबईतल्या कौपरखैरणे इथं राहणार्‍या जीत भानुशालीला पोलीस अधिकारी बनायचं आहे. मात्र, हिमोफिलीया हा गंभीर आजार त्याला जडलाय. 'मेक अ विश' नावाच्या संस्थेनं चिमुकल्या पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा पूर्ण केली. वाशी पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी हा सोहळा घडवून आणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 15, 2015, 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading