S M L

बिबट्याऐवजी चिमुरडेच पिंजर्‍यात !

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2015 05:41 PM IST

बिबट्याऐवजी चिमुरडेच पिंजर्‍यात !

15 ऑगस्ट : नाशिकमधल्या निफाड तालुक्यात सध्या बिबट्याची एवढी दहशत माजलीय की लोकांनी भीतीपोटी आपल्या चिमुरड्यांनाच चक्क पिंजर्‍यात बंद करून ठेवण्यास सुरूवात केलीय. निफाड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिन्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून या घटनेत तीन चिमुरड्यांचा समावेश आहे. या घटनांमुळे हया परिसरातील वीस गावांमध्ये दहशत पसरली आहे.

नाशिक पासून 30 किलो अंतरावर असलेला निफाड तालुका गोदावरी नदी काठचा हा परिसर असल्याने तसा सुजलाम् सुफलाम्..या भागात द्राक्ष बरोबरच उसाची उत्पन्न शेतकरी घेतो. पिण्यासाठी मुबलक पाणी आणि लपन्यासाठी ऊस असल्याने गेल्या काही वर्षांपासून या भागात बिबट्यांचा वावर मोठा आहे. भक्ष म्हणून कुत्री मांजारे कमी झाल्याने बिबट्यानी आपला मोर्चा मानव वस्तीकड़े वळवल्याचे दिसते.दोन महिन्यात या भागात बिबट्याने 4 जणांना आपले भक्ष केले आहे. यातील तीन बालकाना तर घराबाहेर बिबट्याने उचलून नेलेत.

या भागात बिबट्याची दहशत इतकी आहे की, शेतात काम करतांना मुलांना कुठे ठेवावे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने काही शेतकर्‍यांनी घरा बाहेरच मुलांना खेळण्यासाठी पिंजरा तयार केला आहे.

करंजगाव भागात शेतीत काम करतांना महिलांना आणि लहान मुलांना घरातील पुरुष मंडळी हातात लाठ्या काठया घेऊन संरक्षण देतात,बिबट्या कधी येईल आणि हल्ला करेल अशी परिस्थिती या भागात आहे.

बिबट्याच्या भीतीमुळे गावतील ऐरवी सताड़ उघडी असणारी दार खिड़क्या बंद पाहण्या मिळतायत. या मुळे घराबाहेर पडनंही मुश्किल

Loading...

झाल्याचं येथील महिला सांगतात.

बिबट्याचा वावर निफाड तालुक्यातील वीस गावात असून या भागात 12 ते 14 बिबटे असल्याचं गावकर्‍यांचं म्हणणंय. दिवसभरात अनेक वेळा जाता येता गावकर्‍यांना या बिबट्यांचं दर्शन होतंय बिबट्याच्या लहान मुलांवरील हल्ल्यानंतर या भागातील मुलांना शाळेत येताना आणि शाळेतून घरी जाताना पालकांनी सोबत राहावे अशी सूचना शाळेनी पालकांना केली आहे.

निफाड तालुक्यातील चापड़गाव भागात बिबट्याचे हल्ले सर्वत जास्त झाले आहे. काही दिवसांपूर्वीच 10 वर्षीय विकी पीठे या मुलाला बिबट्याने भक्ष केले होते. वन विभागामार्फ़त या भागात सर्वात जास्त पिंजरे लावण्यात आले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्त झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 2 लाखांच्या मदतीची रक्कम शासनाने 7 लाख रुपये केली असून,बिबट्यांच्या होणार्‍या या हल्ल्यानंतर वन विभागाले परिसर 7 ठिकाणी पिंजरे लावले असून नागरिकांनी परिसरात वावरतांना काय खबरदरी घ्यावी अशी सुचना देण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2015 05:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close