बिग बींनी जागवल्या 'शोले'च्या आठवणी

बिग बींनी जागवल्या 'शोले'च्या आठवणी

  • Share this:

Amitabh baccha

14 ऑगस्ट : शोले'ला इतकं यश का मिळालं हे आजही मला कळत नाही. पण, आज 40 वर्षांनंतरही लोक या चित्रपटाविषयी बोलतात, त्यावर चर्चा करतात, प्रश्न विचारतात. याचा अर्थ त्यात नक्कीच काहीतरी आहे,' असं मत महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक विक्रम रचणार्‍या आणि नवनवे पायंडे पाडणार्‍या 'शोले' चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमिताभ यांनी आज खास पत्रकार परिषद घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'शोले'च्या अफाट यशाबद्दल आपल्याला मोठं आश्चर्य आणि कौतुक असल्याचं अमिताभ यांनी यावेळी सांगितलं. या चित्रपटाने आपल्याला भरपूर काही शिकवले असून 'शोले'मुळे चित्रपटात पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्टंट पाहायला मिळाले आणि आम्हाला ते करायला, असेही अमिताभ पुढे म्हणाले.

'आताच्या जमान्यातही लोकांना या चित्रपटाचं आकर्षण का वाटतं हे माझ्यासाठी कोडं आहे. पण चित्रपटातील प्रत्येक पात्रानं लोकांच्या मनाची पकड घेतली आहे हे खरं आहे. मग तो अमजद खान यांनी रंगवलेला गब्बर असो की संजीव कुमार यांचा करारी ठाकूर असो. सगळ्याच भूमिका संस्मरणीय ठरल्या आहेत,' असं ते म्हणाले. चित्रपटातील खलनायक गब्बरची भूमिका करण्याच्या इच्छेचाही पुनरुच्चार यावेळी अमिताभ यांनी केला.

या चित्रपटाने आपल्याला भरपूर काही शिकवले असून चित्रपटात मोठ्या प्रमाणात स्टंटही पाहायला मिळाले आणि आम्हाला ते करायला, असंही अमिताभ पुढे म्हणाले. 'शोले'च काय, आजवर गाजलेल्या अनेक चित्रपटांच्या यशाबद्दल असं ठोस कारण सांगता येत नाही,' असंही अमिताभ यांनी नमूद केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 14, 2015, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading