महेंद्रसिंग धोणीवर 2 मॅचची बंदी : टीम इंडियालाही दंड

19 डिसेंबर स्लो ओव्हर रेटमुळे कॅप्टन धोणीवर दोन वन-डेसाठी बंदी घालण्यात आली आहे तर भारतीय टीमच्या मॅच फीमध्ये कपात केली जाणार आहे. 50 ओव्हर्सचा कोटा पूर्ण करायला भारतीय टीमने तब्बल 45 मिनिटं जास्त घेतली. त्यामुळे हा कठोर निर्णय घेतल्याचं मॅच रेफरी जेफ क्रो यांनी म्हटलं आहे. धोणीवरील ही बंदी तातडीने अमलात येणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या कटक आणि कोलकाता इथं होणार्‍या वन-डेत धोणी खेळू शकणार नाही. धोणीच्या अनुपस्थितीत वीरेंद्र सेहवाग टीमचा कॅप्टन असेल. या बंदीविरोधात बीसीसीआय आयसीसीकडे अपील करणार नसल्याचं श्रीनिवासन यांनी स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2009 09:41 AM IST

ताज्या बातम्या