News18 Lokmat

पवारांचा एल्गार, 15 सप्टेंबरपासून जेलभरो !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2015 08:28 PM IST

 पवारांचा एल्गार, 15 सप्टेंबरपासून जेलभरो !

sharad_pawar_in_osmanabad14 ऑगस्ट : राज्य आणि केंद्र सरकारला शेतकर्‍यांशी काहीही घेणं देणं नाही. त्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडलंय. त्यामुळे या सरकारला ताळेवर आणावेच लागेल. सरकारने शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीतर येत्या 15 सप्टेंबरला जेलभरो आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उस्मानाबादच्या सभेत दिलाय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तब्बल 35 वर्षांनंतर आंदोलनात सहभागी झाले. पवारांनी आज तब्बल 35 वर्षांनंतर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. राष्ट्रवादीने आज शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात धडक मोर्चा काढला. उस्मानाबादेत आज सकाळी हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाच रुपांतर सभेत झालं. स्वतः शरद पवारांनी या मोर्चाचं नेतृत्वं केलं. या मोर्चानंतर पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.

राज्यावर दुष्काळाचे संकट गडद होत चालले आहे. अतिवृष्टी,पाणी टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारलाय. पण, या सरकारला त्याचं काहीही घेणंदेणं नाही. शेतकर्‍यांच्या पाठीशी हे सरकार उभं राहत नाही. नवी सत्ता हाती आलीये पण जनतेचा विसर या सरकारला पडलाय. या सरकारला वेळीच ताळेवर आणण्याचं काम आपल्याला करायचंय. महिन्याभरात या सरकारने जर शेतकर्‍यांची दखल घेतली नाहीतर राज्यभर जेलभरो आंदोलन करू असा इशारा शरद पवारांनी दिला.

शेतकर्‍यांचे प्रश्न संसदेत मांडायचे पण तिथे चर्चाच होत नसल्यामुळे 25 दिवस पाण्यात वाहून गेले आहे. या काळात जनतेचा कळवळा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरकले सुद्धा नाही. उद्या देशाला उद्देशून भाषण करतील पण शेतकर्‍यांचीही त्यांनी आठवण ठेवावी असा टोलाही पवारांनी लगावला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2015 02:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...