अखेर राधे माँ पोलीस स्टेशनमध्ये हजर, चौकशी सुरू

अखेर राधे माँ पोलीस स्टेशनमध्ये हजर, चौकशी सुरू

  • Share this:

radhe_maa_kandivali14 ऑगस्ट : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँभोवती आता कायद्याचा फास आणखी वाढण्याची शक्यता आहे. हुंडा आणि मारहाण प्रकरणी राधे माँ अखेर कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. राधे माँची चौकशी सुरू असून अटक होण्याची शक्यता आहे.

राधे माँविरोधात तिचीच भक्त निक्की गुप्ता हिने कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे राधे माँ सुरुवातील गायब झाली. पण पोलीस लुकआऊट नोटीस जारी करण्याच्या तयारीत असता चमत्कारीकरित्या राधे माँ औरंगाबादेत अवतरली. तिथून पुढे नांदेड आणि त्यानंतर मुंबईत राधे माँ दाखल झाली. अटक होऊ नये म्हणून तिने सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज केला होता. पण कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे तिला आज पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागलं. कांदिवली पोलीस राधे माँची या प्रकरणी चौकशी करणार आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पोलीस राधे माँला दिलासा देता की अटक करता याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 14, 2015, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading