नागपूर जेलमध्ये आणखी एका दोषीला फासावर लटकवणार !

  • Share this:

nagpur central jail13 ऑगस्ट : गेल्या आठवड्यातच नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये याकूब मेमनला फाशी देण्यात आल्यानंतर आता या ठिकाणी आणखी एका आरोपीला फाशी देण्याची तयारी सुरू झालीये. नांदेड कोर्टाने ठोठावलेल्या फशीच्या शिक्षेचा डेथ वॉरंट काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. त्यानुसार फाशीची तारीख ठरवण्याची प्रक्रीया सुरू झालीये.

अनैतिक संबंधात अडचण ठरणार्‍या पत्नी आणि चार मुलांचा निर्दयीपणे खून करणार्‍या सुदाम कनीराम जाधव या 25 वर्षी आरोपीला नांदेड सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती . 3 मुलं 1 मुलगी आणि पत्नीला मारून आरोपी सुदाम जाधव याने त्यांचे मृतदेह तलवात फेकले होते. अत्यंत निर्दयीपणे त्याने 5 जणांची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने नांदेड च्या सत्र न्यायालयाने जानेवारी 2009 साली सुदाम जाधव ला फाशीची शिक्षा ठोठावली होती . या निकालाच्या विरोधात सुदाम जाधवने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्याची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्याने सुप्रीम कोर्टाने पुढची प्रक्रिया सुरू केलीये. येत्या 2 ते 4 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन नांदेड न्यायालयातून सुदामचे डेथ वॉरंट निघण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 13, 2015, 9:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading