राधे माँला धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2015 09:24 PM IST

radhe maa pc13 ऑगस्ट : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सेशन्स कोर्टाने फेटाळलाय. त्यामुळे आता राधे माँला अटक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राधे माँने अटक होऊ नये यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. पण कोर्टाने राधे माँला धक्का देत जामीन अर्ज फेटाळून लावलाय.

दरम्यान, धर्मदाय आयुक्तांनी रमेश जोशी यांच्या तक्रारीची दखल घेतलीये. राधे माँमुळे गुजरातमधल्या कच्छमध्ये 7 जणांनी आत्महत्या केल्याची तक्रार रमेश जोशी यांनी कांदिवली पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली होती. राधे माँविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रमेश जोशींनी केली होती. तसंच, राधे माँ चॅरिटेबल ट्रस्टला येणार्‍या पैशांच्या स्त्रोतांची चौकशी करण्याच्या सुचना धर्मदाय आयुक्तांची प्राप्तिकर खात्याला दिल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2015 09:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...