13 ऑगस्ट : संगमनेर तालुक्यातील रहिमपूर गावात आज (गुरुवारी) सकाळी सात वाजता एका महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केलाय. या महिलेच्या पतीने आरडाओरडा केल्याने बिबट्या पळाला मात्र महिलेच्या गळ्यावर जबर दुखापत झाली आहे. रंजना पोपट गुळवे या महिलेवर वर हा हल्ला केला.
सकाळी रंजना शेतात पाणी भरण्यासाठी गेली असताना तिच्यावर बिबट्याने झडप घातली अन् महिलेला मारण्याचा प्रयत्न केला मात्र रंजना चे पती पोपट गुळवे यांनी प्रसंगावधान दाखवत आराडाओरडा करून बिबट्याला पळवल्याने रंजनाचा जीव वाचलाय. रंजना यांच्यावर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दिवसेंदिवस माणसांवर बिबट्याच्या हल्यात वाढ होताना दिसतेय असे नरभक्षक बिबटे जेरबंद करणे गरजेचं आहे. नाहीतर भक्षाच्या शोधात असणार्या बिबट्याच्या हल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा