बुडत्याचा पाय खोलात, राधे माँचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

बुडत्याचा पाय खोलात, राधे माँचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

  • Share this:

radhe maa pc13 ऑगस्ट : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता धर्मदाय आयुक्तांनी रमेश जोशी यांच्या तक्रारीची दखल घेतलीये. तसंच राधे माँने आता अटक होऊ नये यासाठी धडपड सुरू केलीये. तिने दिंडोशी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केलाय.

राधे माँमुळे गुजरातमधल्या कच्छमध्ये 7 जणांनी आत्महत्या केल्याची तक्रार रमेश जोशी यांनी कांदिवली पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली होती. राधे माँविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रमेश जोशींनी केली होती. तसंच, राधे माँ चॅरिटेबल ट्रस्टला येणार्‍या पैशांच्या स्त्रोतांची चौकशी करण्याच्या सुचना धर्मदाय आयुक्तांची प्राप्तिकर खात्याला दिल्यात. दरम्यान, राधे माँनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दिंडोशी कोर्टात केलाय. हुंड्यासाठी छळ आणि मारहाण केल्याचा निक्की गुप्ता या महिलेनं तिच्यावर आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 13, 2015, 1:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading