11 ऑगस्ट : इंटरनेट क्षेत्रात दादा कंपनी असलेल्या गुगलच्या सीआओपदी भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांची निवड करण्यात आलीये.मुळचे चेन्नईचे असलेले पिचाई हे आयआयटी खडगपूरचे मेटालर्जिकल इंजीनियर आहेत. 2004 साली पिचाई गुगल कंपनीमध्ये कामावर रूजू झाले. गुगल मॅप, ऍड्स आणि प्ले स्टोअर्स, गुगल सर्च, एनरॉइड अशा गुगलच्या शाखांचं काम ते पाहणार आहे.
गुगलने पिचई यांच्या नियुक्तीसह अल्फाबेट या आपल्या सह कंपनीची घोषणा केलीये. आता यापुढे गुगल आपलं कार्पोरेट कामात बदल करणार असूना अल्फाबेट कंपनीच्यासोबत काम करणार आहे. गुगलच्या सहसंस्थापक लैरी पेज यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय, गुगल आता 'स्लिमड डाऊन' कंपनी झाली असून ती अल्फाबेट कंपनीचा भाग आहे. सुंदर पिचाई गुगलला आणखी पारदर्शक आणि नव्या शिखरांवर नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा