राज्यात फक्त 44 टक्के पाणीसाठा, मराठवाड्यात फक्त 7 टक्के शिल्लक !

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2015 10:51 AM IST

08_impact-the-water-cycle-including-vital-ground-water-reserves_reuters11 ऑगस्ट : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात थोडी वाढ झालीये. पण असं असलं तरी पाणीटंचाईचा प्रश्न अजूनही गंभीर बनत चाललेला आहे. राज्यात सध्या केवळ 44 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मराठवाड्यातली परिस्थिती सगळ्यात भयानक आहे. मराठवाड्‌यात सध्या फक्त 7 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडीचा पाणीसाठा तळाशी असून बीड आणि उस्मानाबादमधील धरणांचा पाणीसाठा मृत पातळीतच आहे. सध्या ज्या भागात पाणीटंचाई आहे त्या भागात रेल्वेच्या वॅगननी पाणीपुरवठा करता येईल का, अशा मुद्दयांवर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात जाऊन पाणीसाठा आणि त्याचं नियोजन करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. राज्यातील जलसाठ्याची नेमकी काय परिस्थिती आहे, आणि याच काळात गेल्या दोन वर्षांत किती जलसाठा होता याची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की आपल्यापुढचं हे पाणीसंकट किती गंभीर आहे.

 

राज्यातला जलसाठा (टक्केवारीमध्ये)

 

                                  2015          2014          2013

कोकण विभाग          76                85                81

मराठवाड़ा                   7                 18                 36

नागपूर                       49               68                85

अमरावती                  54               46                79

नाशिक                      38                 50               52

पुणे                            50                   73              84

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2015 10:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close