तुळजाभवनी देवस्थानकडून भक्तांच्या दानाची व्हीआयपींवर उधळपट्टी

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2015 09:39 AM IST

तुळजाभवनी देवस्थानकडून भक्तांच्या दानाची व्हीआयपींवर उधळपट्टी

tuljapur_news11 ऑगस्ट : साडेतीन शक्ती पीठांपैकी एक आसलेल्या तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी दान केलेल्या मौल्यवान दाग दागिने तुळजाभवानी देव स्थानने व्हीआयपी लोकांबरोबर त्यांचे चालक, नातेवाईक यांच्यावर उधळे आहेत. आशीर्वादाच्या नावाखाली देव स्थानने मूर्ती, चांदची तलवार, चांदीचा रथ, महावस्त्र, बनारसी फेटा, महागड्या पैठणी, शालू अशा वस्तू भेट म्हणून देण्यात आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

तुळजाभवानी देवी साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक ,आंध्रातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजाभवानी च्या दर्शनाला येतात. मोठ्या श्रद्धेने हे भाविक तुळजा मातेच्या चरणी दान अर्पण करतात.

मात्र, तुळजाभवानी देव स्थानाने सोनिया गांधींपासून ते विलासराव देशमुख आणि रामदेव बाबा ते आसाराम बापूपर्यंत व्हीआयपी भेटवस्तू म्हणून सोन्या चांदीच्या मूर्त्या भेट म्हणून दिल्या आहे. मूर्ती, चांदची तलवार, चांदीचा रथ, महावस्त्र, बनारसी फेटा, महागड्या पैठणी, शालू अशा वस्तू आशीर्वाद म्हणून देण्यात आल्यात.

विशेष म्हणजे या व्हीआयपीचे चालक, नातेवाईक यांनाही या भेट वस्तू दिल्या जातात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, सुशील कुमार शिंदे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना भेट वस्तूंची ही खिरापत वाटली गेली आहे. विलासराव देशमुख यांना पाच वेळाही भेट देण्यात आलीये. तर स्थानिक आमदार ते जिल्हाधिकार्‍यांनीही या भेटवस्तूंचा लाभ घेतला. भेटवस्तू दिलेल्यांची यादीही 200 पानांची आहे. सामान्य भाविकांच्या दानावर कोट्यवधी लूट करणार्‍या देवस्थानकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी पुजारी मंडळाचे किशोर गगाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2015 09:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close