दहीहंडीचा प्रश्न 'लटकलेलाच' !

  • Share this:

mumbai dahi handi 20132211 ऑगस्ट : दहीहंडी उत्सव जवळ आला असला तरी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबद्दल संभ्रम कायम आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार यंदा 20 फुटांपेक्षा उंच दहीहंडी बांधता येणार नाही. याचबरोबर 12 वर्षांपेक्षा कमी असणार्‍यांना बालगोविंदांना यामध्ये सहभागी होता येणार नाहीये. या निर्णयामुळे दहीहंडी उत्सव समित्यांमधे नाराजी आहे.

गेल्या अधिवेशनात हा निर्णय होण्याची गरज होती. मात्र सरकारनेही या बद्दल कोणतेही ठोस पाऊल उचलले नाहीय. असंच चालत राहिलं तर मंबईतून हे पारंपरिक खेळ हद्दपार होतील, त्यामुळे सरकारने राजकारण बाजुला ठेवत लवकरात लवकर या जाचक अटी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सचिन अहीर यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 11, 2015, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading