केंद्रीय पथक उद्या बीड, उस्मानाबादचा घेणार आढावा

केंद्रीय पथक उद्या बीड, उस्मानाबादचा घेणार आढावा

  • Share this:

patahak_10 ऑगस्ट : मराठवाड्यात दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आज (सोमवारी) दुपारी औरंगाबादमध्ये दाखल झालं. रात्री या पथकानं विभागीय आयुक्तांबरोबर बैठक घेतली. त्यापूर्वी औरंगाबादमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी उभारण्यात आलेल्या कंट्रोल रूमला या केंद्रीय पथकानं संध्याकाळी भेट दिली. हे पथक उद्या बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याचा आढावा घेणार आहे.

मराठावाड्यात सध्या ऐन पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई आहे. मराठवाड्यातल्या 898 गावांमध्ये 1188 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर बीडमध्ये सर्वाधिक 375 गावांमध्ये 506 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय.

मराठवाड्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आतापर्यंत अनेक नेते, मंत्री यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केलाय. पण शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. आता हे पथक पाहणी करून केंद्राला अहवाल देणार आहे. त्यानंतर तरी काही मदत मिळेल का हाच मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांचा सवाल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 10, 2015, 11:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading