...तोपर्यंत मेट्रोची भाडेवाढ होऊ देणार नाही - मुख्यमंत्री

...तोपर्यंत मेट्रोची भाडेवाढ होऊ देणार नाही - मुख्यमंत्री

  • Share this:

cm devendra_fadanvis_news3310 ऑगस्ट : मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिलाय. मात्र, राज्य सरकार आता मुंबईकरांसाठी धावून आलंय.स्पेशल ऑडिट होईपर्यंत मेट्रोची भाडेवाढ होऊ देणार नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे मुंबईकरांना तात्पुरता दिलासा मिळालाय.

मेट्रोच्या तिकीट दरवाढीला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलीये. त्यामुळे तिकिटांचे दर 50 ते 110 रुपये वाढणार आहे. पण यासाठी आणखी 3 महिन्याचा अवधी आहे. पण, राज्य सरकारने मेट्रोच्या दरवाढीविरोधात भूमिका घेतलीये. दिल्लीत या दरवाढीबाबत बैठक सुरू आहे.

दरम्यान नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मेट्रोसंदर्भात दिल्ली गाठली. दिल्लीत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची पाटील यांनी भेट घेतली. मेट्रोची प्रस्तावीत दरवाढ अवास्तव आहे. शुल्क निर्धारण समितीचा भाडेवाढीचा निर्णय चुकीचा असल्याची भूमिका रणजीत पाटील यांनी ठेवली. रिलायन्सचा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च वाढला, मात्र त्यामागे काय कारण आहे, यासाठी कॅगचा रिपोर्ट आल्यानंतर निर्णय घेता येईल असंही पाटील यांनी म्हटलंय. रणजित पाटील यांच्यासोबत नगरविकास खात्याचे सचिवही उपस्थित होते.

तर दूसरीकडे मेट्रोच्या प्रस्तावीत दरवाढीविरोधात आता शिवसेनेनं मोर्चा उघडलाय. आज घाटकोपर मेट्रो स्थानकासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अन्याकारक भाववाढ रद्द करण्याची मागणी शिवसेनेची होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 10, 2015, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading