S M L

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला धावले मराठी कलाकार

Samruddha Bhambure | Updated On: Aug 10, 2015 01:53 PM IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला धावले मराठी कलाकार

10 ऑगस्ट : मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांनी आपली संवेदनशीलता जागृत असल्याचं दाखवून दिलंय. या कलावंतांनी बीड जिल्ह्यातल्या 112 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुंटुंबांना आर्थिक मदत करून एक नवीन आदर्श घडवून दिला आहे. अभिनेते नाना पाटेकर आणि मूळचे बीडचे असलेले अभिनेते मकरंद अनासपूरे यांनी बीड जिल्ह्यातील 112 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 12 हजार रुपयांचा मदत केली.

काही वर्षांपूर्वी डॉ.श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर असे कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन समाजातील शोषित घटकांसाठी सामाजिक कृतज्ञता निधीची सुरुवात केली होती. तशाच प्रकारचं कार्य आता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी हाती घेतलं आहे.गेल्या चार वर्षापासून सतत पडणार्‍या दुष्काळामुळे मराठवाड्यातला शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या चार महिन्यात जिल्हयातील 112 शेतकर्‍यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. यानंच व्यथित होऊन मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांच्यासह सयाजी शिंदे, रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, पुरुषोत्तम बेर्डे आणि जितेंद्र जोशी यांनी या उपक्रमात वाटा उचललेला आहे.

या उपक्रमात नाना पाटेकर यांनी 15 लाख रुपयांची निधी देऊन सर्वाधिक वाटा उचलला आहे. एवढच नाही तर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाला धनादेशासोबतच धीर देण्यासाठी ते स्वत: तिथे उपस्थित राहून आपल्या खास शैलीत शेतकर्‍यांशी संवाद साधला. एखादा शेतकरी आत्महत्या करतो आणि आपण त्या कुटुंबाला मदत द्यायला जमतो हा प्रसंग दुदैर्वी आहे. पण यामुळे खचलेल्या कुटुंबाला नक्कीच थोडा धीर मिळेल अशी भावना नाना पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केली. यानंतर नागपूरमधील 61 शेतकरी कुटुंबांना अशाचप्रकारे प्रत्येकी 15 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2015 01:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close