केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक आजपासून मराठवाड्याच्या दौर्‍यावर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2015 12:54 PM IST

rain farms

10 ऑगस्ट : राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज (सोमवारी) मराठवाड्यात दाखल होणार आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांचा आढावा हे तीन पथक घेणार आहेत.

गेल्या आठवड्यात विदर्भातल्या बर्‍याच भागात समाधानकारक पाऊस झाला. मात्र ऑगस्ट निम्मा संपूनही मराठवाडा कोरडाच आहे. त्यामुळे खरीपाची पेरणी यावर्षी वाया जाण्याची चिन्हं आहेत.मराठवाड्यातील 898 गावांमध्ये 1188 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, तर बीडमध्ये सर्वाधिक 375 गावांमध्ये 506 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यातील बळीराजा हतबल झाला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चालले आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला पण शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. आता हे पथक पाहणी करून केंद्राला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर तरी काही मदत मिळेल का हाच मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांचा सवाल आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2015 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...