वादग्रस्त राधे माँ औरंगाबादेत, पोलिसांनी केली 2 तास चौकशी

  • Share this:

radhe maa07 ऑगस्ट : वादग्रस्त आध्यात्मिक गुरू राधे माँ आज औरंगाबादेत मुक्कामी आहे. औरंगाबाद क्राईम ब्रांचने राधे माँची 2 तास चौकशी केली. मात्र राधे माँ च्या विरोधात अटक वॉरंट नसल्याचं कळताच औरगाबाद पोलीस परत गेले. उद्या सकाळी राधे माँ गुरद्वाराच्या दर्शनासाठी नांदेडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

स्वता:ला देवीचा अवतार समजणार्‍या राधे माँ कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलीये. राधे माँ विरोधात राधे माँ विरुद्ध निकी गुप्ता हिने कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केलाय. सासरची मंडळी हुंड्यासाठी छळ करत असल्याचा निकीचा आरोप आहे. गुप्ता कुटुंब राधे माँचे भक्त आहे. तिच्या सांगण्यावरुनच निकीचा छळ होत असल्याचा तिचा आरोप आहे.मात्र, हा गुन्हा खोटा असल्याचं राधे माँचे सेक्रेटरी संजीव गुप्ता यांनी दावा केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2015 11:12 PM IST

ताज्या बातम्या