पुन्हा मुंबई थांबली, वाहतूक पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे रुग्णाला मिळाले जीवनदान

पुन्हा मुंबई थांबली, वाहतूक पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे रुग्णाला मिळाले जीवनदान

  • Share this:

mulund hospital news07 ऑगस्ट : आज पुन्हा एकदा मुंबई काही मिनिटांसाठी थांबली. एका अवयव दात्याचं ह्रदय, यकृत आणि किडनी एका रुग्णापर्यंत पोहचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी यशस्वी मोहिम राबवत वाहतूक बंद केली होती. ऐन गर्दीच्या वेळी 20 किलोमिटरच अंतर अवघ्या 15 मिनिटांत पार पाडलं गेलं. त्यामुळे रुग्णाला जीवनदान मिळाचं पण वाहतूक पोलिसांच्या कामगिरीचं कौतुकही होत आहे.

वाशीच्या एमजीएम हॉस्पिटलमधून एक अवयव दात्याचे ह्रदय, यकृत, किडनी हे अवयव आज मुंबईत आणले गेले. वाशीच्या एमजीएम हॉस्पिटलमधून हे अवयव आणण्यात आले. मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ते नेलं जाणार होतं. यासाठी वाहतूक पोलिसांनी काही वेळ वाहतूक बंद केली होती. 20 किलोमिटर अंतर 15 मिनिटांत पार केलं होतं. विशेष म्हणजे ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांनी ही जबाबदारी पार पाडली. चारच दिवसांपूर्वी फोर्टिस हॉस्पिटलमधील रुग्णावर यशस्वी ह्रदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली होती. यासाठी पुण्यातील जहागीर हॉस्पिटलमधून एका रुग्णाचं ह्रदय मुंबई विमानाने आणण्यात आलं. आणि विमानतळ ते मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटल 20 किलोमीटरचं अंतर 18 मिनिटांत पार करण्यात आलं होतं. आज पुन्हा एकदा अशाच एका रुग्णासाठी मुंबई थांबली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2015 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...