भयंकरच ; उकरलेलं प्रेत, कवट्या आणि पैशांचा पाऊस !

भयंकरच ; उकरलेलं प्रेत, कवट्या आणि पैशांचा पाऊस !

  • Share this:

vikramgad4405 ऑगस्ट : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात पोलिसांनी आज (बुधवारी) भोंदूबाबांचा पर्दाफाश केला. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जमलेल्या भोंदूगिरीचा डाव पोलिसांनी उधळवून लावला. या कारवाईत मानवी कवट्या, एक मानवी सांगाडा, अशी अघोरी सामग्री सापडली. सहा भोंदूबाबांना अटक करण्यात आली मात्र, जवळपास 20 भोंदूबाबा पसार झाले.

विक्रमगड इथल्या साखरा गावातल्या जंगलात पैशांचा पाऊस पाडण्याचा भोंदूबाबांचा कार्यक्रम होता. त्यासाठी मंडपही उभारण्यात आला होता. या कार्यक्रमात 25 ते 30 भोंदूबाबा होते. या कार्यक्रमावर विक्रमगड पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांना दहा मानवी कवट्या, एक मानवी सांगडा, पुरल्यानंतर बाहेर काढलेला मृतदेह, हजार, पाचशे, शंभरच्या नकली नोटा, त्यासाठी लागणारा कागद, तलवारी, जिंवत काडतूस अशी सामुग्री मिळाली. या प्रकरणात सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून एक महिनाभर पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आढळून आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 5, 2015, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading