Elec-widget

फॅशनेबल कपडे घातले म्हणून भावाकडून बहिणीचा खून

फॅशनेबल कपडे घातले म्हणून भावाकडून बहिणीचा खून

  • Share this:

Kolhapur murder

05 ऑगस्ट : आपली बहिण फॅशनेबल कपडे घालते, व्हॉट्सअपवर मुलांशी बोलते म्हणून चिडलेल्या भावाने चक्क काठी आणि पाईपच्या सहाय्याने बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. ऐश्वर्या सुनील लाड असं त्या तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला असून, तिचा भाऊ ओंकार सुनील लाडला पोलिसांनी काल (मंगळवारी) अटक केली. कोल्हापुरातया धोत्री गल्लीत सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

ऐश्वर्याला फॅशनेबल कपडय़ांची आवड होती. तिच्या या आवडीमुळे ओंकारचे मित्र त्याची चेष्टा-मस्करी करायचे. त्यामुळे ओंकारला राग येत असे. फॅशनेबल कपडे घालण्यावरून ऐश्वर्या आणि ओंकार यांच्यात वाद झाला. त्या रागात ओंकारने काठी आणि पाईपने तिला बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या ऐश्वर्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान, ओंकार हा मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी त्याचा वैद्यकीय दाखला पोलिसांना दिला आहे. त्यानुसार त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. मात्र या घटनेनं ऐश्वर्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2015 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...